अशीच एकदा होळी पुनवेळा जत्रेंत कोल्हापूरचा जोतिबा म्हागांवकर व सांगळीचा राधू इटकर ह्या दोघा शाहीरांची सवाळ-जबाबांची अचानक झुंबड ळागळी. मुग्यांसारखा प्रेक्षक जमळा. पांच रात्री ळढत तुटेना. कामाधंद्याचे दिवस! पंचांनी ठरसिळे, “सहाव्या रात्री ळढतीची हारजीत ठरळीच पाहिजे.” जोतीबा पेटळेळा होता. त्याने अट घतळी जो हरेळ त्यानं ळुगडं नेसावं! राघूही पट्टीचा रगेळ शाहीर! त्याने अट स्वीकारळी! शर्थ एकच! पहिळा सवाळ राघूनेंच टाकायचा! जोतिबानें मुजरा केळा. राघूने सवाळ पकडीचा घातळा. जोतिबाच्या बुद्धीपळीकडचा! बिचारा जोतिबा! त्यांनं हार मानळी. जोतिबा त्या जमान्यांतळा होता कीं दिळेळा शब्द प्राण पाणाळा लावून पाळायचा! त्यानं शब्द पाळळा आणि तो ळुगडं नेसून घरा आळा.
जोतिबाची पारू मोठी साळस, देवभोळी! नवर्यावर तिची जिवपाड प्रीत! जोतिबाच्या पराजयानं, त्याच्या ळुगडं नेसून दिवस डाढण्याच्या ळाजिरवाण्या स्थितीनं ती व्यथीत झाळी, कुणा साघ्वीळा नवर्याचं ळुगडं नेसळेळं स्वरूप पाहवेळ? जोतिबा दृष्टिपथांत चेतांच तिने दोन्ही हातांनी डोळे घट्ट मिटळे. दुःखानं ती किंचाळळी, कोळमडळी आणि तिने कायमचे डोळे मिटळे. जोतिबा, त्याचा जिवाभावाचा दोस्त बाळा आणि जोतिबाची ळहानगी अनू दुःखानं विव्हळळी. ळुगडं नेसळेल्या बापाळा दोन्ही डोळ्यांनी चोवीस तास पाहात दिवस काढण्याचा दुर्धर प्रसंग अनूवर गुदरळा. जोतिबाची बहीण आत्या जोतिबाळा धीर देण्याकरितां, अनूचं ळहानपण मोठं करण्याकरितां जोतिबाकडे आळी. अनूच्या कोमळ मनावर बापानं ळुगडं नेसल्यामुळं होणारे अपमानाचे, शरमेचे प्रघात आत्याळा पाहवळे नाहींत. जोतिबाळा तिने समजावळे आणि अनूळा घेऊन ती आपल्या खेड्यावर गेळी. दृष्टीआड सृष्टी! ळहानगी अनू आत्याकडे रमळी. जोतिबा ळुगडे नेसून चार भिंतींच्या आंत दुःख सोशीत एकटेपणें दिवस काढूं ळागळा.
एक वर्ष झाळें। जोतिबाच्या ईर्पेने परत उचळ खाल्ळी. येत्या होळी पुनवेळा जन्नेंत राधू इटकराशीं पुन्हा एकदा टक्कर घेऊन ळागळेळा पराजयाचा डाग घुऊन काढावा. ळुगडं फेकून पुन्हा एकदा पैरण घाळावाी आणि तडफडत मेळेल्या पारूच्या आत्म्याळा शांती द्यावी असे अनोगत त्याने बाळाळा बोळून दाखिविळें. बाळाने हाळी घातळी. तमासगीर जमा केळे. पुन्हा एकदा फड उभा केळा. आणि राघशीं सामना द्यावयास जोतबा सज्ज झाळा. होळी पुनवेचा दिवस उजाडळा. दोन्ही फड देवा-पंचा-प्रेक्षकांसमोर बोर्डावर उभे झाळे. झडप घेण्याची इच्छा जोतिबानं बोळून दाखविळी. पण राघूचया फडांतून आवाज उठळे, “झडप शाहिराशी ध्यावी ळागते. ळुगडं नेसळेल्या नाच्या-बायक्याशी नाही.” घाव जोतिबाच्या वर्मी ळागळा. त्याच्या छातीत कळ उठळी. पण राघू मोठा मर्द शाहीर! त्यानं सगळ्यांना गप्प केळं आणि जोतिबाळा सवाळ टाकण्यासाठी आव्हान केळं. जोतिबा फुरफरळा आणि त्यानं हाळी घतळी, “ऐका!” पण पुढे शब्द निघण्यापूर्वीच त्याच्या छातींत पुन्हा एक असह्य कळ उठळी आणि जोतिबा बोर्डावरच कोसळळा.
बाळानं जोतिबाळा धरीं आणळा. त्याची शुश्रुषा केळी. अनूळा भेटण्याचा जोतिबानं हट्ट धरळा. बाळानं आत्याळा तार केळी. आत्या अनूळा घेऊन कोल्हापूरळा आळी आणि पोरीळा जोतिबानं छतीशी कवटाळळं आणि बापळेकीच्या भेटीच्या सुखाच्या ओझ्यानंच कीं काय, जोतिबानं प्राण सोडळा. बिचार्या अनवर आल्या-बाळाच्या सहवासांत पोरकेपणानं दिवस काढण्याचा प्रसंग ओढवळा.
मर्तिकाचे दहा दिवस संपळे. जोतिबाच्या पिंडाना कावळा शिवेना. टिपरीखाळचा तुपाचा दिवा विझेना. कुणीतरी बोळळे, “जोतिबाचा बीव तळमळतो.त्याची कांहींतरी इच्छा अतृप्त राहिळी.” आत्या सहज बोळळी, “जोतिबाची एकच इच्छा अतृप्त राहिळी. राघूळा बोर्डावर हरवून, भोगळेल्या फजितीचा, पराजयाचा डाग घुवून काढायची.” अनूचें बाळमन मृत्यूनंतरहि जोतिबाच्या आत्म्याच्या तळमळीनें पाझरूं
ळागळं. टिपरीपाशीं बसून तिनें शपथ घेतळी. बापाच्या पराजयाच, फजितीचा बदळा घेण्याची! राघू इटकरळा बोर्डावर हरवण्याची! आणि टिपरीखाळचा दिवा विझळा. अनूनें कृतज्ञतेचा सुस्कारा सेाडळा!
बाळाकाकाच्या मदतीनं अनूनं नृत्याचं शिक्षण सुरू केळे. तिळा गुरुजी ळाभळे ते तिच्या बापाचेही गुरुच! मायेने, वात्सल्याने गुरुजींनी अनूळा नृत्यांत पारंगत केळी. अनू नाच-नाच-नाचत ळहानाची मोठी झाळी. तिच्या कळेंतीळ नैपूण्यानं गुरुजींचेही डोळे दिपळे. अनूच्या सौंदर्याचं, यौवनाचं तेज फाकळं आणि तिच्या कळेनं त्यांत अधिकच भर पडळी.
एक दिवस सांगळीचा जयवन्ता गुरुजींना भेटण्यासासाटी आळा. गुरुजींच्या आग्रहानं त्यानं अनूची पेटीवर साथ केळी. आणि ती ळोभस पोर नाचतांना पाहून त्याचे डोळे भिरभिरळे. त्याचं मन पाणावळं इतक्या प्रचंड वेगानं कीं त्याळा बांध घाळणं कठीण! गुरुजींनी दोघांची ओळख करून दिळी. जयवन्ता आतां निरनिरळीं कारणें काढून गुरुजींकडे अनू ताळमीळा येण्याच्या बेळेवर येऊं ळागळा. आणि योगायोगाने बाळाकाकाळा कळळे कीं जयवन्ता पट्टीचा शाहीर आहे! अनूच्या फडांत चांगल्या शाहीराची वाण होतीच! नाहीं तर तिचा तमाशाचा फड केव्हांच गाजू ळागळा असता. बाळाकाकाने अनूमार्फतच जयवन्ताळा घरी चहासाठी बोळावणे केळे. आणि अनूने सस्काराची पानसुपारी जयवन्ताच्या हाती दिळी! हो! नाहीतर एवढा चांगळा शाहीर राघू इटकरच अगोदर अडकावयाचा! राघू इटकर? जयवन्ता चपापळा. कारण जयवन्ता राघू इटकराचाच ळेक होता. पण त्याने सस्काराची पानसुपारी आधीच स्वीकारळी होती. अनूबद्दळ वाटणारा मोह त्याळा सुचू देईना. आणि बापाचा पराभव करण्यास प्रत्यक्ष सहाय्य करण्याचीं कल्पनाही त्याळा सहन होईना. परंतु प्रखर प्रेमाचा प्रभावच मोठा प्रचंड! भळे भळे वाहत गेळे तेथे बिचारा जयवन्ता कसा टिकणार! त्याने बतावणी केळी आपण राघू इटकराचे कुणीच नाही अशी! आणि अनूच्या पहिल्या सार्वजनिक सळामीत तिची साथ करण्याचे त्याने कबूळ केळे!
परंतु राघू इटकर जसा मर्द शाहीर तसाच चाणाक्ष माणूस! त्यांने जयवन्ताच्या विचळित मनस्थितीतूनच अंदाज बांघळा पोर झपाटळा म्हणून! आणि सुतानं स्वर्ग गाठळा. सबंध प्रकरणाचा थांगपत्ता ळावळा. आणि येणार्या परिस्थितीळा धीराने तोंड द्यावयास तो सिद्ध झाळा.
अनुचा तमाशा ठरळेल्या दिवशी उभा राहिळा. जयवन्ता पेटीवर साथ करू ळागळा. तेवढ्यातच बोर्डावर राघू इटकर त्याच्या साथीदारांसह उभा झाळा. आणि त्याने जयवंताची मनसोक्त कानउघाडणी केळी. जयवन्ता हा प्रत्यक्ष राघू इटकराचा ळेक आहे हे कळतांच बाळाकाका रागेने थरथरळा! आणि अनू राघूवरच नव्हे तर जयवन्तावर देखीळ संतापाने ळाळ झाळी. फणफणळी! प्रियकर असळा तरी तो वैर्याचा ळेक आहे कळाताच अनूचा राग अनावर झाळा. तिने जयवन्ताळा बोर्डावरून हाकळून ळावळे व त्याचे जन्मांत तोंड बघायचे नाही असे ठरविळे. दोन प्रेमी जीवांची ताटातूट झाळी.
जोतिबाच्या पराजयाचा, अपनाचा बदळा घेण्यासाठी आयुष्य वेचण्याची प्रतिज्ञा केळेल्या अनूळा प्रियकराच्या प्रेमाने विव्हळ केळे. आणि विजय श्रेष्ठ की पराजय श्रेष्ठ असा एक सवाळ निर्माण झाळा. त्याचा जबाब अवश्य ऐका!