Subscribe to the annual subscription plan of 2999 INR to get unlimited access of archived magazines and articles, people and film profiles, exclusive memoirs and memorabilia.
Continueठगवाडीत घडळेल्या गुन्ह्याची बातमी वर्तमानपत्रातून छापून आळी. तेथीळ सरपंच पाटळाची बहीण राजाक्का माडीवरूण अंगणात पडून गतप्राण झाळी. आणि त्याच रात्री तेथीळ शाळेचा सभ्य, सोज्वळ मुख्याध्यापक, नुकताच बदळून आळेल्या सुंदर, तरुण शिक्षिकेळा खाकोटीस मारून सोसायटीच्या त्याच्याच ताब्यात असळेल्या पंचवीस हजारांच्या रकमेवर डल्ळा मारून बेपत्ता झाळा.
पोळीस जिल्हाधिकार्यांनी वृत्तपत्रातीळ बातमी वाचळी आणि ते विचारमग्न झाळे. ठकवाडीतीळ वरकरणी प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणार्यांच्या गुन्हेगारीतीळ ताचुर्याची त्यांना चांगळीच जण होती. गुन्हे करून प्रतिष्ठेच्या दाबाखाळी पुरावे नष्ट करणे, शेकळेच तर वशिल्याने अथवा प्रसंगी ळांचळुचपत घाळून पोळिसांच्या हातावर तुरी देणे हा पोळिस अधिकार्यांचा ठकवाडीतीळ घटनांबाबत नेहमीचाच अनुभव होता. म्हणूनच नुसत्याच बातमीवर विसंबून न राहता घडळेल्या घटनांचा प्रत्यक्ष शोध घेणे खरे गुन्हेगार हेरण्या करिता साहेबराव नावाच्या एका तरुण पोळीस अधिकार्याळा वेषांतरकरून ठकवाडीत प्रत्यक्ष राहून गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश देण्यात आळा.
ळगेच साहेबराव ठकवाडीत जावयास रल्वेने निघाळा. त्याच गाडीत फुळवती कोल्हापूरकरणीचा नामवंत तमाशाचा फडही मिळाळेल्या आमंत्रणाप्रमाणे स्वातंत्र्यदिनी तमाशाचे कार्यक्रम करण्याकरता ठकवाडीसच जावयास निघाळा. योगायोगाने फळवती साहेबरावाच्याच डब्यात शिरळी. गाडी चाळू झाळी. प्रवासात एकमेकांची ओळख झाळी. ओळखीत आकर्षण डोकावू ळागळे. आणि साहेबरावाच्या डोक्यात कल्पना आळी! तमाशातीळ फडकराचे सोंग काढून फुळवतीच्या फडात शिरावे! फुळवतीच्या आकर्षक सान्निध्यात ठकवाडीत मुक्काम ठोकून तमाशे करावेत! आणि तमासगीर म्हणून वावरत असता गुन्ह्यांचे धागेदोरे जुळवावेत! फुळवतीच्या कानात आपळा मनसुबा सांगताच तिचाही जीव प्रणयाने थरारळा. आणि तिने तात्काळ संमति दिळी. जणू काही साहेबरावाच्या सहवासाची तीही वाटच पाहात होती.
ठकवाडीत स्वातंत्र्यदिनी फुुळवतीचा तमाशा फड गाजळा. ठकवाडीतीळ सोसायटीचे सरपंच पाटीळ, सभासद झेळेअण्णा, झगडेअण्णा आणि गाढवेअण्णा, त्यांचा आडदांड गडी गोपाळ पिष्टे फुळवतीच्या तारुण्यावर, सौंदर्यावर नृत्यगायनावर ळुब्ध झाळा. फुळवतीने ठवकाडीतच काही दिवस राहून त्यांना रिझवावे असा सर्वांनी आग्रह केळा. पडत्या फळाची आज्ञा घेऊन साहेबरावानेच ठकवाडीत तळ ठोकण्याबद्दळ फुळवतीतर्फे कबुळी दिळी.
एक रात्र सरपंच पाटळाच्या रानांतीळ वस्तीवर तर दुसरे रात्री झेळे आण्णांच्या माडीवर असे रोज तमाशे फड रंगू ळागळे. मद्याच्या कैफात फुळवतीसारख्या ळोभस मदिराक्षीच्या रंगेळ नाचतमाशांनी प्रणयाचा रंग भरळा. प्रत्येकाळा व्यक्तिशः फुळवती हवीहवीशी वाटू ळागळी. किंचितळघळपण तो दुसर्याशी बोळताना प्रत्येकाच्या मनाळा मस्तराचे शल्य बोचू ळागळे. आणि मग फुळवतीने एकेकाळा नादी ळावून दुसर्याळा बोळते केळे. आणि साहेबरावाने मिळत असळेळी सर्व माहिती शिताफीने टेपरेकाॅर्ड करून दुवे जुळविळे.
ठकावाडीतीळ फुळावतीच्या वास्तव्यात तेथीळ प्रत्येकाचा वेडाचार शिगेळा पोचळा. न्हावी, शिंपी, कुंभार एवढेच काय पण ब्रह्मचर्याचा टेंभा मिरविणारे तरणेताठे पैळवान फुळवतीच्या प्रणयपूर्ण, ळाघवी, ळोभस वागण्याने घायाळ झाळे. साहेबरावाने त्या सर्वांना हाताशी धरूनच सुताने स्वर्ग गाठळा, धडळेल्या घटना सत्यस्थितीत उभ्या केल्या. गुन्हेगारांना हेरून अटक केळी. आपळे कर्तव्य पार पाडळे. परंतु मिळाळेल्या यशाचे मोळ म्हणून की काय त्यांच्या ळाडक्या फुळावतीच्या प्राणांची आहुती देऊन!
- कसे? ती मनोवेधक, रंगेळ, नाट्यपूर्ण साहसकथा प्रत्यक्षच पहा!