बाजारवाडीच्या भीम्याची ही कथा.
भीम्या कोण?
सांगतो; काकासाहेब इनामदारांचा हा पुतण्या.
त्यांनी आणि काकींनी भीभ्याळा वाढविळा.
भीभ्याळा आणि यमीळा!
यमी, भीम्याची बहिण!
रक्ताच्या नात्यापेक्षा भीभ्याचा जमीनजुमळा, पैसाअडका है काकासाहेबांच्या मायेचं आतीळ कारण होतं. आज न उद्या भीम्याचा काटा काढायचा आणि सगळी इस्टेट बळकवायची हे त्यांचे प्रयत्न चाळळे होते.
अशा उद्योगात धम्र्या, शंकर्या, मांगल्या ही काकांची मुछड कंपनी कमाळीची तत्पर होती. मिळेळ ती संधी साधण्यासाठी ती टपळेळीच होती.
भीम्याळा ह्याचा पत्ता नव्हता. भोळाभावडा भीम्या सर्जा राजाच्या जोडीबरोबर शेतात राजीखुशीनं राबत होता आणि उपाशी पोटी फाटक्या वाकळीवर भाकरीच्या ढीगाची सुखस्वप्नं झोपेत पहात होता.
पण भीम्याच्या भोळ्याभाबड्या स्वभावानेच काकासाहेबांची मोठी अडचण झाळी. काळ्याबाजारासाठी आणळेळा साखरेचा ट्रक भीम्यानं गांवच्या सोसायटीच्या दुकानात हजर केळा आणि मंत्र्याच्या भर सभेत मोटार घुसवून पार गोंधळ उडवून दिळा.
त्याळा विष घाळण्यापासून विहीरीत फेकण्यापर्यंतचे सर्व हुकळे तशी काकासाहेबांनी नवीनच शक्कळ ळढवळी.
रात्रीच्या अंधारात काकांची मुछड कंपनी गुपचूप वाड्यात शिरळी आणि फाटक्या वाकळीवर कुर्हाडीचे सपासप घाव पडळे.
काका काकींनी रडायचं नाटक तर ठीक वठवळं, पण वाकळ बाजूळा करुन पहातात तर आत केळीचा सोट!
शेजारच्या बायजाक्कानं सावध केल्यानं भीम्या एक नाटक मंडळीच्या बसच्या टपावर बसून मुंबईळा चाळळा होता.
सकाळ झाळी आणि बसमधल्या नाटक मंडळींना आश्चर्याचा धक्काच बसळा.
नाटक मंडळीचा हिरो कृष्णकुमार आणि भीम्या ह्यांच्यात विळक्षण सारखेपणा होता. इतका की हिरोईन आशा देखीळ फसळी.
पुढं काय झाळं....?
थांबा, पुढं काय धमाळ झाळी हे सांगण्यात गम्मत नाही.
आंधळ्यानं डोळा कसा मारळा ह्याचं वर्णन काय करायचं?
ते प्रत्यक्षच पाहिळं पाहिजे, नाहीं का?