This section is for paid subscribers only. Our subscription is only $3700/- for one full year.
You get unlimited access to all paid section and features on the website with this subscription.
दोन मित्रांची मैत्री आयुष्यभर टिकते मण मग दोन मैत्रिणींची जोड़ी लग्नांतर का तुटावी? कोणत्याही भाषेतला सिनेमा असो की साहित्य। दोन मैत्रिणींवर एकादं झकास गाणं किवा तरल कविता का सापडू नये? या प्रश्नाची उत्तर शोधणार्या वैजू आणि मयुरीच्या निखळ आणि घट्ट मैत्रीच्या गोष्टीतच बिनधास्तचं कथासूत्र सामावलेलनं आहे।
वैजू (शर्वरी जमेनीस) आणि मयुरी (गौतमी मधूर) या दोन संपूर्णतः भिन्न स्वभाव? प्रकृती आणि कौटूंबिक पाश्र्र्वभूमी असलेल्या मैत्रिणी आहेत। आजचं विविध संस्कृतीचा संकर असलेल रंगीत संगीत तुकड्यांचं महाविद्यालयीन जीवन त्या मुक्तपणे जगत आहेत। त्यांच्या या जगण्यात दोस्तीसाठी काय वाटेल ते करण्याची जिगर आहे, अत्यंतिक प्रेम आहे तसाच टोकाचा तिरस्कारही आहे, स्पर्धा आहे, इर्षा आहे, गटबाजी आहे, धत्तिंग आहे आणि राडाही आहे। ए.सी.पी. निशा वेलणकर (मोना आंबेगांवकर) सारख्या धडसी महिला पोलिस अधिकार्याविषयीचा त्यांच्या मनातला आदर जितका प्रामाणिक आहे तितकीच त्यांच्या शत्रूपक्षातल्या शीला सोहोनी (मीनल पेंडसे) नावाच्या विद्यार्थिनीशी असलेली त्यांची ’खुन्नस’ ही खरी आहे।
अशा स्वप्नवत जगण्याची मस्त झिंग अनुभवत असताना या वैजु-मयुरी समोर एकच अडचण आहे। मयुरीने लवकर लग्न करावं असा तिची आत्या मानसी पटवर्धन (रिमा) हिचा सतत आग्रह सुरू आहे। लवकर लग्न करण्याच्या या संकटातून आपल्या मैत्रिणीची तात्पुरती सुटका व्हावी म्हणून वैजू एकदा आत्याला एक गंमतीशीर थाप मारते आणिा पुढे हीच थाप त्यांच्या आयुष्यात उठवते एक अनपेक्षित वादळ! त्यांच्या जगण्यातला आनंद खरवडून काढणारं वादळ! छप्पर हरवलेल्या दोघींनां हे वादळ अक्षरशः रस्त्यावर आणतं आणि या दोन जिवलग मैत्रीणींचा सुरू होतो अनेक चढउतार, चकवे, वळणं असलेला शोध प्रवास। या प्रवासात त्यांना भेटणारी चित्रविचित्र माणसं भीती, संशयासारख्या भावनांना आणि भूक, तहानेसारख्या गरजांना त्यांचं सामोरं जाणं आणि अखेरीस हाती अनपेक्षित गवसणारा सत्याचा एक तुकडा आणि होणारा मैत्रीचा साक्षात्कार म्हणजेच ’बिनधास्त’।
[From the official press booklet]