This section is for paid subscribers only. Our subscription is only $3700/- for one full year.
You get unlimited access to all paid section and features on the website with this subscription.
शरद घागरे अणि सुरेश परकर हे दोघे जिवलग मित्र- दोघेही सुशिक्षित बेकार. नाही म्हाणायला सुरेश नाटकातून भूमिका करीत असतो. पण त्यातूनही उतपन्न शून्य. अशा अवस्तेत दोघे चाळीतल्या एका खोलीत दिवस कंठीत असतात. खोलीचे भाडे सहा - सहा महिन्याचे तुंबलेले. त्यामूळे चाळीचा मालक पेडणेकरमामा हा काठी घेऊनच पाठी लागलेला. रात्री बेरात्री त्याचा डोळा चुकवूनच दोघे खोलीत घुसत असत.
त्याच चाळीतला एक भाडेकरू घाटगेमामा व त्याची मुलगी वासंती, यांचाच काय तो या दोघांना आधार. शेवटी घाटगेमामाच आपल्या ओळखीने शरदला एका मोटर गॅरेजमध्ये नोकरीला लावतो अणि सुरेश नेहमीप्रमाणे रंगदेवतेची फुकट सेवा करण्यात धन्यता मानतो.
एके दिवशी शरदच्या कालेजमध्ये माजी विद्याथ्र्याचा सत्कार असतो. सुरेशही त्याच्या सोबत जातो. या समारं भात शरदला त्याच्या गुणवत्तेबद्दल बरीचशी बक्षिसे मिळतात. ते पाहून त्याच कालेजमधली मंदाकिनी नावाची सुंदर तरूणी त्याच्यावर खुष होते.
ती त्याचा हात धरून त्याला काँटिनमध्ये घेऊन जाते अणि इकडे सुरेश मात्र त्याची बक्षिसे सांभाळीत प्रेक्षागारातच बसून राहतो. तिथेच त्याला डुलकी लागते. जेव्हा वाचमन त्याला जागा करतो तेव्हा खूप रात्र झालेली असते. सुरेश बक्षिसे सावरीत बाहेर येतो. एका गाडीला हात करतो. त्यामध्ये अॅड. चिटणीस आणि त्यांची कन्या वृंदा असतात. वृंदा सुरेशला लिफ्ट द्यायचे मान्य करते.
गाडीत ती त्याच्या हातातील बक्षिसे पाहून खुष होते. बक्षिससांवरचे नाव वाचून ती त्याला *आपणच शरद घागरे काय\ म्हणून विचारते. तो ’होय’ म्हणून थाप ठोकून देतो. अणि इथूनच थापाथापीच्या हास्यमय ना्याला सुरूवात होते. इकडे सुरेश वृंदाला आपणच शरद घागरे म्हणून थापा मारू लागतो तर तिकडे शरद मंदाकिनीला आपण खूपच श्रीमंत असल्याच्या थापा मारीत राहतो.
योगायोगाने शरद ज्या गॅरेजमध्ये नोकरी करीत असतो, ते गॅरेज मंदाकिनीच्या वाडिलांचे निषते आणि शरदची त्रेधा तिरपीत उडते. इकडे सुरेश परकर व वृंदा चिटणीस प्रकरणही चांगलेच रंगात आलेले असते.
एके दिवशी मंदा व वृंदाचे] दोघीचेही वडील त्यांना सांगतात की, *तुमचा जो कोणी शरद घागरे हाअे, त्याला अणि त्याच्या वडिलांना घेऊन या. मगच आम्ही तुमचं लग्न त्याच्याशी करू* वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून दोघीही शरद घागरेच्या शोधात एकाच पत्त्यावर येऊन पोचतात.
आणि मग सुरू होतो, सात मजली हास्याचा हल्ला गुल्ला!
पुढची धमाल शब्दात वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष पडद्यावर बघणेच योग्य!
[From the official press booklet]