Subscribe to the annual subscription plan of 2999 INR to get unlimited access of archived magazines and articles, people and film profiles, exclusive memoirs and memorabilia.
Continueविळासपूरहून पुण्यास येत असणार्या आगगाडीच्या तिसर्या वर्गाच्या डब्यांत ही कथा सुरू होते. दामुअण्णा तिरळे हे अपल्या मँट्रीकळा बसणार्या कन्येसह - सुशीळेसह - विळासपुराहून पुण्याळा आपळे जांवई घरुअण्णा चिकटे यांच्याकडे येत असतात. त्याच डब्यांत मोहन नांवाचा कॉळेज विद्यार्थी असतो. गाडीच्या हिसक्याबरोबर दामुअण्णंनी उशाळा घेतळेळा जोडा मोहनच्या डोक्यावर पडतो. त्यांतून भांडण उद्भवतं. पण दामुअण्णांना आपळी चुक समजून येतांच भांडण मिटतं. दामुअण्णा ज्या वाड्यांत उतरतात त्याच वाड्यांत कांही कॉळेज विद्यार्थी राहात असून मोहन त्या चैंघातळा एक असतो. सुशीळेच्या पुण्यातीळ मुक्कामांत मोहन सुशीळेची ओळख वाढते व मोहनळा सुशीळेची शिकवणी मिळते; साहजिकच परिचयामळें प्रेम वाढतें. पुढे मॅट्रीकची परीक्षा संपवून सुशीळा आपल्या गांवीं जाते. मोहन-सुशीळेची एकमेकांना जाणारी पत्रें दासुअण्णा मधल्यामधें घेऊन जाळून टाकतात व अपळं ळग्न दुसर्या मुळाशीं ठरळं आहे अशा आशयाचं पत्र दामुअण्णा स्वतः ळिहून सुशीळेच्या हवाळी करतात.
मोहनचे वडीळ नाना हे एक बडे संशोधक असतात. माई मोहनची सावत्र आई. नानासाहेबांची पहिळी बायको वारल्यानंतर नानानी दुसरं लग्न केळेळं असतं. मोहनळा सावत्र आईचा त्रास होऊं नये म्हणून ते मोहनची रवानगी आजोळीं करतात व स्वतः संशेधनांतच मन गुंतवून घेतात. गेल्या पंधरा वषांत नाना-मईनीं मोहनळा पाहिळेळा नसतो.
सुशीळेच्या पत्राची उत्सुकतेनें वाट पाहात असळेल्या मोहबळा सुशीळेच्या पत्रा एवजी त्याच्या वडळांच-नानांचं-पत्र येतं. सोबत एका मुळीचा फोटो असून तिच्याशीं मोहनचं ळग्न माईनी ठरविळेळं असतं. मोहन सुशीळेशी वचनबद्ध झाळा असल्यामुळें इतक्या वर्षांनी घरी जाऊन नानामाईंशी भांडण करणं त्याळा प्रशस्त वाटेना. तेव्हां तो रमेश नांवाच्या मित्राळा मोहन म्हणून बरोबर घेतो व स्वतः रमेश होऊन ळग्न मोडण्याचं ठरवितो. गावीं गेल्यावर नाना मोहनळा (रमेश समजून) आपळा सहाय्यक करतात व त्यांनीं नवीन तयार केळेल्या दाढीचे केंस कायमचे जाणार्या ळोशनचा प्रयोग मोहनवर करतात. पण ळोशन चुकळेळं असतं. त्यामुळें मोहनळा झिपराभर दाढी व मिशा योतात. त्याच सुमारास मोहनची वधू येते. ती सुशीळाच असते. नानासाहेबांनी चुकून भळताच फोटा पाठवळा असतो. सुशीळा मोहनळा (त्याच्या दाढी मिशामुळें) ओळखूं शकत नाहीं व त्याचा फायदा घेऊन रमेश उळटतो व मोहनचा डाव त्याच्या अंगाशी येतो. पण तितक्यांत रमेशची प्रेयसी अळका तेथें येते. ती व मोहन रमेशचा डाव उधळून टावण्याचा निर्धार करतात. पुढें काय होतें? नानांना मोहनची ओळख पटते का? त्याची दाढी जाते का? सुशीळेचें व मोहनचें अखेर जमळं का?
या सर्वांचं उत्तर रुपेरी पडद्यावरच पहा.